आयपीएल सुरू असताना आयसीसी टी-20 रँकिंग जाहीर, खराब फॉर्मातील सूर्यकुमार ‘या’ स्थानावर

 

आयपीएल सुरू असताना आयसीसी टी-20 रँकिंग जाहीर, खराब फॉर्मातील सूर्यकुमार यास्थानावर

आयपीएल सुरू असताना आयसीसी टी-20 रँकिंग जाहीर, खराब फॉर्मातील सूर्यकुमार 'या' स्थानावर


                                      आयपीएल सुरू असताना आयसीसी टी-20 रँकिंग जाहीरखराब फॉर्मातील सूर्यकुमार या’ स्थानावर


                  सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. पण तरीदेखील बुधवारी (12 एप्रिल) जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आयसीसी क्रमवारीत सूर्यकुमारच सर्वोत्तम ठरला आहे. टी-20 क्रमवातीत फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमारने आपला पहिला क्रमांकावर कायम राखला आहे. त्याव्यतिरिक्त पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने ताज्या टी-20 क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

ताज्या आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. त्याच्याकडे एकूण 906 रेटिंग पॉइंट्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे, ज्याच्याकडे 811 रेटिंग पॉइंट्स आहेत. बाबर आझम 755 रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका संघाचा ऍडन मार्करम, तर पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे आहे. मार्करमकडे 748, तर कॉनवेकडे 745 रेटिंग पॉइंट्स आहेत.  भारतीय दिग्गज विराटट कोहली टी-20 क्रमवारीत 15व्या क्रमांकावर काय आहे.

सूर्यकुमार यादव सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. अशात पुढच्या दोन महिन्यांमध्ये त्याला एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळायचा नाहीये. दुसरीकडे शनिवारी (14 एप्रिल) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत सूर्यकुमारला मागे टाकण्यासाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्याकडे संधी आहे. हे दोन्ही फलंदाज मायदेशातील या मालिकेत चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. अशात सूर्यकुमारच्या पहिल्या स्थानाला धक्का देखील येत्या काही दिवसांमध्ये लागू शकतो. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचा देखील आयसीसी क्रमवारीवर फरक पडला. श्रीलंकेच्या महीश तिक्षणा याने आपल्या कराकिर्दीतील सर्वोत्त क्रमवारी मिळवली. सध्या तो गोलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या पाचव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा आदील राशिद आणि महीश तिक्षणा 684 रेटिंग पॉइंट्ससह टी-20 गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान 710 रेटिंग पॉइंट्ससह गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. (the ICC T20 rankings are announced, with Suryakumar Yadav at number one)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.