Isha Ambani: मुकेश अंबानींच्या मुलीची खेळण्यांच्या व्यवसायात एंट्री; 'या' कंपनीसोबत केला करार

 

Isha Ambani: मुकेश अंबानींच्या मुलीची खेळण्यांच्या व्यवसायात एंट्री; 'या' कंपनीसोबत केला करार

Isha Ambani: मुकेश अंबानींच्या मुलीची खेळण्यांच्या व्यवसायात एंट्री; 'या' कंपनीसोबत केला करार

          Isha Ambani: भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी आणि रिलायन्स रिटेलची प्रमुख ईशा अंबानी आता खेळणी बनवण्याच्या व्यवसायात उतरणार आहे.

रिलायन्स रिटेलने रविवारी जाहीर केले की त्यांनी हरियाणास्थित कंपनीसोबत संयुक्त उपक्रम (Joint venture) स्थापन करून खेळण्यांच्या स्थानिक उत्पादनाच्या व्यवसायात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील घरगुती खेळण्यांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स रिटेल कंपनीने हा निर्णय घेतला आहे रिलायन्स रिटेलकडे सध्या यूकेच्या खेळण्यांचा ब्रँड हॅम्लेज आणि घरगुती खेळण्यांचा ब्रँड रोवन आहेत. रिलायन्स रिटेलने सोनपतची कंपनी ई-सर्कील रिटेलसोबत संयुक्त उपक्रम करून खेळण्यांचा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स रिटेलचे सीएफओ दिनेश सलुजा म्हणाले, "आम्ही सर्कल ई-रिटेलसह संयुक्त उपक्रमात प्रवेश केला आहे आणि आम्ही खेळण्यांचे उत्पादन आणि रिटेलिंग व्यवसायाचा झपाट्याने विस्तार करण्यासाठी काम करत आहोत."

रिलायन्स रिटेल कंपनी डिझाइनपासून सेल्फ डिलिव्हरीपर्यंत सर्व प्रक्रिया एकत्रित करण्याच्या धोरणावर काम करत आहे.

 अंबानींच्या मुलांचाही व्यवसायात डंका, आकाश अन् ईशा यांनी सांभाळली 'या' कंपनीची कमान

 

रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या मार्च तिमाहीत विक्रमी नफा नोंदवला आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीने १९,२९९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याचे अहवालात सांगितले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत त्याचा नफा १६,२०३ कोटी रुपये होता. कंपनीचा महसूल दोन टक्क्यांनी वाढून २.१६ लाख कोटी रुपये झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही बाजार भांडवलच्या दृष्टीने भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. रिलायन्सच्या ग्राहक व्यवसायातील सततच्या वाढीमुळे महसुलाला आधार मिळाला आहे. रिलायन्स जिओ आणि रिटेलने या तिमाहीत चमकदार कामगिरी केली आहे.

रिलायन्स जिओने मार्च तिमाहीत नफ्यात वार्षिक १३ टक्क्यांनी वाढ नोंदवली असून, त्याचा निव्वळ नफा ४,७१६ कोटी रुपयांवर नेला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत जिओचा नफा ४,१७३ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या तिमाहीत जिओचा महसूल २३,३९४ कोटी रुपये होता. रिलायन्स जिओची कमान मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीच्या हाती आहे.

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले की, जिओने एक प्रमुख भूमिका बजावत देशभरात वेगाने 5G आणले आहे. Jio च्या 5G सेवांनी ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत आणि हे Jio नेटवर्कवरील ग्राहकांवरुन स्पष्टपणे दिसून येते. डिजिटल सोसायटी मजबूत करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. जून २०२२ मध्ये आकाश अंबानी यांना रिलायन्स जिओ इनफोकॉमच्या अध्यक्षपद दिले होते.

मार्च तिमाहीत रिलायन्सचा रिटेलचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक १२.९ टक्क्यांनी वाढून २४१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा एकूण महसूल १९.४ टक्क्यांनी वाढून ६९,२८८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत रिलायन्स रिटेलचा महसूल ५८,०१७ कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर, रिलायन्स रिटेलचा EBITDA ३२.६ टक्क्यांनी वाढून ४,९१४ कोटी रुपये झाला आणि EBITDA मार्जिन ७.१ टक्के होता. रिलायन्स रिटेलने चौथ्या तिमाहीत ९६६ नवीन स्टोअर उघडले आहेत, यामुळे कंपनीच्या एकूण स्टोअर्सची संख्या १८,०४० झाली आहे. रिलायन्स रिटेलने या तिमाहीत सर्व फॉरमॅटमध्ये २१ कोटी ९० लाख पेक्षा जास्त वाटचाल नोंदवली.

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी यांनी तिमाही अहवालावर सांगितले की, रिलायन्स रिटेलने वर्षानुवर्षे मोठी वाढ केली आहे. रिलायन्स रिटेल आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत सर्वोत्तम उत्पादने देत आहे. आम्ही व्यवसाय पुढे नेत आहोत. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून आमची धोरणे बनवली जातात.  ईशा अंबानी ऑक्टोबर २०१४ पासून रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या बोर्डाचा एक भाग आहेत.

रिलायन्स रिटेल डिझाईन करण्यापासून ते खेळण्यांचे उत्पादन आणि किरकोळ विक्रीपर्यंत सर्व व्यवसाय स्वतः करत आहे. यामुळे रिलायन्सला थर्ड पार्टी उत्पादक अवलंबित्व कमी करण्यात मदत होईल.

रिलायन्स रिटेल टॉईजच्या विद्यमान दोन ब्रँड्स, हॅमलेज आणि रोवनची जबाबदारीही नवीन संयुक्त उपक्रमावर टाकण्यात आली आहे. रिलायन्स रिटेल ही B2B (Business-to-Business service) विभागातील एक मोठी कंपनी आहे जिथे ती रोवन ब्रँडद्वारे व्यवसाय करते.

सर्कल ई रिटेल कंपनी खेळण्यांच्या निर्मितीमध्ये स्पेशलायझेशन आहे. हरियाणामध्ये त्याची आधुनिक उत्पादन सुविधा आहे आणि खेळण्यांचे उत्पादन आणि वितरण करण्यास कंपनी सक्षम आहे.

रिलायन्स रिटेलच्या या वाटचालीचा उद्देश ब्रँडेड खेळण्यांच्या बाजारपेठेत मोठा वाटा मिळवणे आणि लहान दुकानांपर्यंतही पोहोचणे हा आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.