मनरेगा योजना
मनरेगा योजना
मनरेगा योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम एक भारतीय कामगार
कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे त्याचे मुख्य उद्दिष्टे ‘ कामाच्या अधिकाराची हामी देणे’ असे आहे. सप्टेंबर
२००५ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार गँरेटी अधिनियम एक भारतीय कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय
आहे त्याचे मुख्य उद्दिष्टे ‘कामाच्या अधिकाराची हामी देणे’
असे आहे.
सप्टेंबर २००५ मध्ये
हा कायदा लागू करण्यात आला. सुरूवातीला या कायद्याचे नाव नरेगा असे होते, परंतु पुढे येणाऱ्या यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या व त्याचे नाव
बदलून mgnrega असे करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण योजना गँरेटी अधिनियम याचा मुख्य उद्देश देशातील गरीबांना रोजगार हक्काची
हमी देणे आहे. तसेच संपूर्ण देशातील ग्रामीण कुटुंबांना वित्तीय वर्षात शंभर दिवस
प्रति कुटुंब कुशल रोजगार प्राप्त करून देणे हादेखील या योजनेचा उद्देश आहे.
मनरेगा योजना म्हणजे काय?
MGNREGA चे पूर्ण फुल फॉर्म आहे -
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. याला हिंदीत महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणतात. MGNREGA ही
भारत सरकारद्वारे लागू केलेली रोजगार हमी योजना आहे, जी ७
सप्टेंबर २००५ रोजी विधानसभेत मंजूर झाली. त्यानंतर २ फेब्रुवारी २००६ रोजी २००
जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात झाली. सुरुवातीला याला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
कायदा (NREGA) असे म्हटले जात होते परंतु २ ऑक्टोबर २००९
रोजी त्याचे नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असे करण्यात
आले.
मनरेगा
ही जगातील एकमेव योजना आहे जी १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देते. या योजनेसाठी
केंद्र सरकारने २०१०-११ या आर्थिक वर्षात ४०,१०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. देशातील गरीब व बेरोजगार कुटुंबे
आपल्या उदरनिर्वाहासाठी या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा कमकुवत उत्पन्न गटातील
लोकांना त्यांच्याच ग्रामपंचायतीत रोजगार दिला जातो, त्यामुळे
स्थलांतराचा प्रश्नही बऱ्याच अंशी टळला आहे. सरकारने प्रत्येकाच्या हाताला
रोजगार देण्यासाठी एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला. दिनांक २ फेब्रुवारी २००६ रोजी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ लागू केला. सुरवातीला केवळ २०० जिल्हात
ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र,
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ठळक
वैशिष्ट्ये:
1.
मागेल त्याला
काम या तत्वावर ग्रामीण भागातील कुटुंबातील व्यक्तींना एका आर्थिक वर्षात केंदीय
निधीतून १०० दिवसांची रोजगाराची हमी दिली जाते. तसेच, २६५ दिवसाची हमी राज्य शासनाकडून दिली जाते.
2.
अंगमेहनतीने काम करण्याऱ्या कुटूंबातील इच्छूक प्रौढ व्यक्तींनी
लेखी किंवा तोंडी नोंदणीसाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडे अर्ज करावा लागतो.
3.
कुटुंबातील प्रौढ व्यक्ति अर्जाद्वारे त्याच्या कुटुंबातील सर्व
व्यक्तिंची नोंदणी करता येऊ शकते.
4.
सर्व इच्छुक कुटुंबांच्या रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड) फोटोसहीत
लॅमीनेटेड ओळख पत्र देणे बंधनकारक आहे.
5.
कामासाठी अर्ज केल्याच्या १५ दिवसाच्या आत मोफत जॉब कार्ड दिले
जाते.
6.
अर्ज
केल्याच्या दिवसापासून १५ दिवसांच्या आत जर रोजगार दिला नाही तर, कायद्यानुसार दैनंदिन रोजगार भत्ता
राज्यसरकारने द्यायचा असतो
7.
घराच्या ५ किलोमीटरच्या पुढील अंतरावर रोजगार पुरविण्यात आल्यास
अतिरिक्त प्रवास आणि जिवकेसाठी मजुरीच्या १०% वाढीव रोजगार पुरविण्यात येतो.
8.
मजुरांची मजुरी काम केल्यापासून १५ दिवसांच्या आत मजुरांच्या बँक
खात्यावर e-fms प्रणालीव्दारे
किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाते. अन्यथा ०.०५% विलंब आकारणी देय होते.
9.
पुरुष आणि स्त्रियांना सामना रोजगार दर दिला जातो.
10.
रोजगाराठी नोंदणी अर्ज केलेल्यापैकी एक तृतियांश महिला असणे गरजेचे
असते.
11.
अधिकाधिक मजुरांना लाभ मिळण्यासाठी या योजनेत केल्या जाणान्या
कामांसाठी कंत्राटदार आणि यंत्रसामुग्री वापरण्यास बंदी आहे.
12.
ग्रामपंचायत स्तरावर ५०% खर्चाची विकासकामे या योजने अंतर्गत करणे
आवश्यक असते.
13.
कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार, बरोबर आणलेल्या ६ वर्षांखालील लहान मुलांना सांभाळण्याची सोय इत्यादी
सुविधा असायला हव्यात. तसेच, दुखापत झाल्यास रुग्णास सर्व
रुग्ण सेवा व दैनिक मजुरीच्या ५०% रुग्ण भत्ता देण्यात येतो. अपंगत्व व मृत्य
झाल्यास रु. ५०,०००/- पर्यंत अनुदान व कुटूंब नियोजनासाठी
सवलती देण्यात येतात.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजने अंतर्गत केली
जाणारी कामे –
मनरेगा योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच, ज्या व्यक्तींना
वैयक्तीक स्वरूपातील कामे जसे की,
वैयक्तिक कामे
सिंचन विहीरी
शौचालय
शेततळे
जनावरांचा गोठा
कुक्कुटपालन शेड
जलसंधारणाची कामे इत्यादी करण्यासाठीदेखील या योजने अंतर्गत रोजगार पुरविला जातो.
सार्वजनिक स्वरूपातील
कामे
- गावात वृक्ष लागवड करणे
- विहिरी/पाझर तलाव/गाव तलावतील गाळ
काढणे
- पांदण/शेत / वन
क्षेत्रातील/गावाअंतर्गत रस्ते / पायवाटा तयार करणे
- फळबाग लागवड करणे (फलोत्पादन)
- रेशीम उत्पादन, रोपमाळा व वनीकरण करणे
- खतनिर्मिती करणे
- पशुसंवर्धनाची कामे करणे
- जल व घनकचरा व्यवस्थापन करणे
- स्वच्छतागृह बांधकाम करणे
- मत्सव्यवसायाला चालना देण्याकरिता
पायाभूत सुविधा निर्माण करणे
जॉबकार्ड (Job
card) काढण्यासाठी पात्रता -
1. ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.
2. वय वर्ष १८ पासून पुढे असावा.
3. अंगमेहनतीचे काम करण्याची तयारी असावी.
सदरची माहिती ग्रामपंचायत मार्फत nrega वेबसाईट भरली जाते व संबंधित मजूर हा nrega साठी पात्र ठरतो. त्याला छोटी पुस्तिका ग्रामपंचायत मार्फत देण्यात येते त्यालाच job card म्हणतात.
जॉबकार्ड काढण्याची पद्धत -
संबंधित मजुराने खालील कागदपत्रे त्याच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक यांच्याकडे द्यावी.
1. कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज नमुना नंबर १ (ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध आहे)
2. गावातील रहिवाशी असल्याचा पुरावा (रेशनकार्ड zerox, आधारकार्ड zerox, इतर कोणताही पुरावा)
3. बँक पासबुक zerox
4. कुटुंबाचा एकत्रित ४*६ चे ३ फोटो
काम मागणीची पद्धत -
1. काम मागणीचा अर्ज नमुना क्र. ४ भरून देणे.
2. जॉबकार्ड details.
काम मागणी केल्यानंतर १५ दिवसात काम दिले जाते. जर १५ दिवसांत काम दिले गेले नाही तर बेरोजगार भत्ता देण्यात येतो.
Nrega अंतर्गत घेता येणारी वैयक्तिक कामे मिळवण्यासाठी
आवश्यक कागदपत्रे -
1. विहित नमुन्यात अर्ज
2. जॉबकार्ड details
3. संबंधित कामासाठी लागणारी सर्व कागदपत्रे
4. ग्रामसभेची मान्यता.
जी कामे घेण्याची आहे ती ज्या शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात येतात त्यांच्याकडे ग्रामपंचायत मार्फत अंदाजपत्रक, तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मंजुरी करिता पाठविली जातात. त्यानंतर संबधित यंत्रणांकडून सर्व मंजुरी होऊन कार्यारंभ आदेश दिला जातो. हि सर्व माहिती nrega वेबसाईट update करून कामांचे E-musters काढले जातात.
मजुरी
अदा करण्याची पद्धत -
संबंधित मजुराने जॉबकार्ड काढताना किंवा E-musters काढताना जे बँक पासबुक zerox दिलेले असेल त्यात किंवा आधार लिंक केलेला असल्यास आधार बेस पेमेंट द्वारे बँक मध्ये E-musters चा कालावधी संपल्यावर ८ दिवसात मजुरी थेट खात्यात जमा होईल. वैयक्तिक कामांबाबत कुशलचे पेमेंट (उदा. फळबाग लागवड मध्ये रोपे खरेदी, पिशव्या खरेदी, खते ई. साहित्य) हे देखील थेट त्याच खात्यात जमा होते. सार्वजनिक कामांचे कुशलचे पेमेंट हे संबंधित यंत्रणेच्या खात्यात जमा होऊन नंतर संबंधिताना देण्यात येते.
सन २०१२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता मनरेगा ची मजुरी रक्कम रु. २४८ /- प्रतिदिन आहे.
संपर्क -
अनु.
पदनाम
नाव
दूरध्वनी
1 |
अपर मुख्य सचिव
(रोहयो) |
श्री. नंदकुमार, भा.प्र.से. |
022-22025349 |
||||
2 |
आयुक्त
(मगांराग्रारोहयो ), नागपूर |
श्री. शान्तनु गोयल, भा.प्र.से. |
0712-2555501 |
Post a Comment