labour welfar
labour welfar
labour welfar
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्याकरिता विविध
योजना सुरू केलेल्या आहेत. त्यापैकी बांधकाम कामगार योजना ही एक आहे. या
योजनेअंतर्गत बांधकाम कामगार रोजगार उपलब्ध करून दिला जातो. बांधकाम कामगारांचा
सामाजिक सुरक्षा, त्यांच्या मुलांचे शिक्षण,
त्यांना आरोग्याविषयी सहाय्य आर्थिक सहाय्य अशा प्रकारच्या विविध
कल्याणकारी योजना महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सुरू केलेल्या
आहेत. या योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ कामगारांना आर्थिक मदत म्हणून दिला
जाणार आहे.
बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट -
·
या योजनेअंतर्गत बांधकाम
कामगारांचे जीवनमान सुधारणे.
·
तसेच धोकादायक क्षेत्रांमध्ये
बालकामगारांना काम न करू देणे.
·
कामगारांची रोजगार क्षमता आणि
रोजगाराच्या संधी वाढवणे.
·
त्यांचा कौशल्य विकास करणे.
·
सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी
उपायांसाठी कार्य करणे.
·
व्यवसायिक आरोग्य आणि
कामगारांच्या सुरक्षिततेसाठी धोरण किंवा कार्यक्रम करून कामगारांच्या जीवनशैलीत
सुधारणा घडवून आणणे.
·
घातक कामांपासून बाल श्रम काढून
श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकटीकरण प्राप्त करणे.
·
कौशल्य विकास आणि रोजगार
सेवांचा प्रचार करणे.
अशा अनेक बाबींचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जर
तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा असेल, तर तुम्ही अर्ज करून अत्यंत सोप्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकता.
बांधकाम कामगार या लाभास पात्र असतील, कोणता लाभ मिळेल, अनुदान
किती मिळेल, आवश्यक कागदपत्रे कोणती असतील, बांधकाम कामगार योजना फायदे, बांधकाम कामगार नोंदणी 2023
कशी करायची? या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार
आहोत. या योजनेचा लाभ हा ग्रामीण आणि शहरी कामगार बांधवांना घेता येणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र लाभार्त्यांनी योजनेच्या लाभाचा अवश्य लाभ घ्यावा.
बांधकाम कामगार योजनेचा लाभ -
या योजनेअंतर्गत जे
कामगार नवीन इमारत बांधण्यात पासून ते ती इमारत पूर्ण होईपर्यंत काम करतात. अशा
सर्व कामगार या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी समाविष्ट आहेत. असे सर्व कामगार या
योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि नोंदणी करण्यास पात्र ठरतील.
·
खुदाई कामगार
·
फर्णिचर,
सुतार कामगार
·
गवंडी कामगार
·
फींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)
·
पेंटींग कामगार
·
सेंट्रींग कामगार
·
वेल्डिंग
·
फॉब्रीकेटर्स
labour welfar
बांधकाम कामगार योजना फायदे -
नोंदणीकृत बांधकाम कामगाराला खालील योजनांचा लाभ घेता येईल.
A. नोंदणीकृत बांधकाम कामगारास बांधकाम करताना
लागणारे साहित्य खरेदीस तीन वर्षातून एकदा ५,०००/- रुपये
दिले जातील.
B. नोंदणीकृत
बांधकाम कामगाराच्या घरातील पहिल्या विवाहाच्या खर्चास ३०,०००/-
रुपये दिले जातील.
C. बांधकाम
कामगाराच्या पत्नीस २ आपत्या पर्यंत
·
नैसर्गिक प्रसुतीसाठी – १५,०००/-
·
शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी
– २०,०००/-
D. बांधकाम
कामगाराच्या दोन पाल्यास प्रतीवर्षी –
·
१ ली ते ७ वी पर्यंत प्रतीवर्षी
२,५००/- रुपये दिले जातील.
·
८ वी ते १० वी पर्यंत
प्रतीवर्षी ५,०००/-रुपये दिले जातील.
·
११ वी १२ वी पर्यंत प्रतीवर्षी
१०,०००/- रुपये दिले जातील.
·
पदविका अभ्यासक्रम साठी – २०,०००/-रुपये दिले जातील.
·
अभियांत्रिकी पदवीसाठी – ६०,०००/-
·
वैद्यकीय पदवीसाठी – १,००,०००
·
MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी
शुल्काची परीपूर्ती केली जाईल.
कामगाराने
एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८
वर्षापर्यंत प्रत्येकी १,००,०००/- मुदत
बंद ठेव.
·
बांधकाम कामगाराच्या
कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी – १,००,०००/- अर्थसाहाय्य
·
बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती
केंद्राअंतर्गत उपचारासाठी -६,०००/-
अर्थसाहाय्य
·
बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास
– २,००,०००/-
अर्थसाहाय्य
·
बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास
अंतविधीसाठी -१०,०००/- अर्थसाहाय्य
·
बांधकाम कामगाराचा मूत्यु
झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रति वर्ष असे सलग 5 वर्षे -२४,०००/- अर्थसाहाय्य
·
नोंदणीकृत कामगाराचा कामावर जर
मूत्यु झाला तर त्याच्या कुटुंबाला – ५,००,०००/- अर्थसाहाय्य
·
घर बांधणी साठी-४,५०,०००/- अर्थसहाय्य (केंद्र शासन- २,००००० /- कल्याणकारी मंडळ- २,५०,०००/-) अर्थसाहाय्य
नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन
आरोग्य योजना लागू केली जाईल आणि त्याचा लाभ घेता येईल.
बांधकाम कामगार योजना अटी -
·
बांधकाम कामगार योजनेचा लाभ १८
ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांना घेता येईल.
·
अर्जदार कामगार महाराष्ट्राचा
नागरिक असणे गरजेचे आहे.
·
मागील १२ महिन्यांमध्ये ९०
दिवसापेक्षा जास्त त्याने बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
·
योजनेचा लाभ घेण्यासाठी
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यामध्ये नोंदणी करणे.
बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे -
·
या योजने अंतर्गत नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत
संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
·
होमपेज वर गेल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी असा पहिलाच
ऑप्शन मिळेल. त्यावर ती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
·
आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
·
त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
·
आधार क्रमांक भरायचा आहे.
·
मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि Process to Form या बटनावर क्लिक
करायचे आहे.
·
आत्ता तुमच्या समोर बांधकाम कामगार नोंदणी अर्ज ओपन होईल.
·
त्यामध्ये खालील विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल.
·
Personal
Details / वैयक्तिक माहिती
·
Permanent
Address / कायमचा पत्ता
·
Family
Details / कौटुंबिक तपशील
·
Bank
Details / बँक तपशील
·
Employer
Details / नियोक्ता तपशील
·
Details
of the 90 Days Working Certificate / ९० दिवसांच्या कामकाजाच्या
दाखल्याचा तपशील
·
Supporting
documents / समर्थन दस्तऐवज
·
वरील सर्व माहिती भरून Save बटनावर क्लिक करायचं आहे.
·
सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करावा
लागेल.
संपर्क –
दूरध्वनी क्रमांक
(022) 2657-2631
(022) 2657-2632
Post a Comment