Student portal

 

Student portal

               साडे 19 लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही

       
                              Student portal

    विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. तर 39 लाख विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदच होत नाही. यामुळे शिक्षकांना सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरताना मोठी अडचण येत आहे.

              राज्यातील साडे 19 लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून (Education Department) समोर आली आहे. तर 39 लाख विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदच होत नाही. यामुळे शिक्षकांना सरल  प्रणालीमध्ये  विद्यार्थ्यांची माहिती भरताना मोठी अडचण येत आहे. विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन, मोफत पुस्तके-गणवेश मिळवण्यासाठी सरल प्रणालीत आधार कार्ड नोंदणी गरजेची आहे.
 
          दरवर्षी राज्यातील शिक्षकांकडून सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरली जाते. मागील तीन महिन्यापासून शिक्षक विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचं काम करत आहेत. सरल प्रणालीमध्ये माहिती भरत असताना यामध्ये विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी सुद्धा गरजेची आहे. मात्र शिक्षण विभागाकडून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. तब्बल साडे 19 लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने सरल प्रणालीमध्ये त्यांची नोंद करण्याचं काम अडलं आहे. सरल प्रणालीमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीनुसार शिक्षकांचे सुद्धा समायोजन दरवर्षी शिक्षण विभागाकडून केलं आहे.

 

सरल प्रणालीमध्ये 39 लाख विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये आधार कार्ड नोंदणी होईना -
         तर 39 लाख विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये आधार कार्ड नोंदणी होत नाही. याची मुख्य तीन कारणं समोर आली आहेत.
*आधार कार्ड तयार नाहीत (Aadhaar Card Not Generated)
*आधार कार्ड शाळांना, शिक्षकांना दिलेले नाही (Aadhaar Card Not Reported)
*आधार कार्डमधील माहिती जुळत नाही (Aadhaar Card Information Mismatch)

                              Student portal

एका क्लिकवर विद्यार्थ्यांची माहिती -
           शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. अंमलबजावणी करताना शाळा स्तरावरुन वारंवार माहिती घ्यावी लागते. ही माहिती तयार करुन वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यास शिक्षक, मुख्याध्यापक व प्रशासकीय यंत्रणा यांचा बराच वेळ खर्च होतो. त्यामध्ये वेळेची बचत होऊन ही वेळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपलब्ध व्हावा यादृष्टीने विद्यार्थी माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तसंच या प्रणालीमुळे विद्यार्थी लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल. या प्रणालीमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्रशासकीय यंत्रणा इत्यादी सर्व घटकांना विद्यार्थ्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.

तुमच्या आधार कार्डमध्ये बदल करायचा असेल तर -
        आधार क्रमांक म्हणजेच युआयडीएआय (UIDAI) द्वारे भारतातील रहिवाशांना जारी केलेला 12-अंकी ओळख क्रमांक आहे. एखाद्याच्या आधारमधील माहिती अचूक असणे तसेच अद्ययावत असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे

आधार ऑनलाइन सेवांचा उपयोग करण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. मोबाईल नंबर ऑनलाइन अपडेट करता येत नाही. तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी, तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्राला (ASK) किंवा आधार नोंदणी अपडेट केंद्राला भेट देणं गरजेचं आहे.

आधार नोंदणी केंद्रात नोंदणी/सुधारणा/अपडेट फॉर्मसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. एकाच वेळी एकापेक्षा जास्त प्रकारचे अपडेट हे एक अपडेट मानले जाते.

आधार कार्डमध्ये तुम्ही नाव, जन्मतारीख, लिंग किती वेळा बदलू शकता?

UIDAI कार्यालयाच्या मेमोनुसार, आधार कार्डधारक आता आधार कार्डवरील त्याचे नाव फक्त दोनदा बदलू शकतो.

जन्मतारीख (DoB) आधार कार्ड अपडेट करणे
तुम्ही तुमच्या आधारमध्ये जन्मतारीख (DOB) फक्त एकदाच अपडेट करू शकता. एका पेक्षा अधिकवेळा जन्मतारीख अपडेट करणे अत्यंत अपवादात्मक प्रकरणात करता येईल. तुमचे नाव असलेल्या वैध जन्मतारीख (DoB) पुराव्यासह तुम्ही तुमच्या आधारमध्ये जन्मतारीख (DoB) अपडेट करू शकता.

आधार कार्डमध्ये लिंग अद्ययावतीकरण
आधारकार्डमध्ये लिंग तपशील एकदाच अपडेट केले जाऊ शकतात. त्यासाठी तुम्ही आधार केंद्रावर अपडेट करू शकता आणि नंतर अपवादानुसार अपडेटच्या मंजुरीसाठी UIDAI च्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.