आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास
विकास महामंडळ मर्यादीत मुंबई या महामंडळाची स्थापना शासन निर्णय क्र. अमामं 1998/प्र.क्र.363/रोस्वरो-1, दि.27/11/1998 अन्वये
करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यात ज्या जाती जमातीसाठी स्वतंत्र महामंडळ
अस्तित्वात नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या
समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी,
त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी
दूर करणे, असा या महामंडळाचा उद्देश आहे. सदर महामंडळ हे
कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे.
महामंडळातील कर्ज मंजुरीची पद्धत
लाभार्थ्याने
कर्ज प्रकरण अर्जाच्या तीन प्रतीत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात सादर केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सदर कर्ज
प्रकरणांची पडताळणी करुन किफायतशीर असल्याचे तपासून स्थळ पाहणी अहवाल सादर केला
जातो. नंतर प्रकरणाची एक प्रत बँकेकडे शिफारस करण्यासाठी पाठविली जाते. बँकेची
मंजुरी मिळाल्यानंतर प्रकरण महामंडळाकडे पाठविले जाते. त्यानंतर प्रकरणाची छाननी
करुन महामंडळाकडून बीज भांडवल मंजूर केले जाते व त्यानंतर मंजूर रक्कम जिल्हा
कार्यालयाकडे पाठविली जाते. जिल्हास्तरावर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बीज
भांडवल बँकेकडे वर्ग केले जाते आणि बँकेमार्फत लाभार्थ्यास कर्ज वितरण केले जाते.
आताWeb:http://mahaswayamrojgar.maharashtra.gov.in./Forms/JobScheme.aspx
या वेबसाईटवरुन आपणास ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाली
आहे. त्याचा लाभ घ्यावा सदर वेबसाईटवर योजना या ऑपशनमध्ये आपणास कर्ज प्रकरणासाठी
आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच माहिती पूर्ण तयार केल्यानंतर आपण वरील
वेबसाईट वरुन ऑनलाईन अर्ज सादर करु शकता. त्या करिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात यावयाची आवश्यकता नाही किंवा कार्यालयाकडून अर्ज
घ्यावयाची आवश्यकता नाही. तसेच तयार केलेल्या कागदपत्रांच्या फाईलच्या तीन प्रती
ज्यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात
कार्यालयातील अधिकारी स्थळ पाहणी करता भेट देतील. त्यावेळी त्यांना देण्यात
याव्यात अधिक माहितीसाठी 0233-2600554 दूरध्वनी क्रमांकावर
संपर्क साधावा.
कर्ज मंजुरीनंतर करुन द्यावयाची कागदपत्रे
बीज
भांडवल योजनेंतर्गत अर्जदाराला मनी रिसिप्ट, डिमांड प्रॉमिसरी नोट,
सिक्युरिटी बाँड, सेकंड हायपोथिकेशन डीड
इत्यादी वैधानिक कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे. टीप-योजनेच्या अधिक
माहितीसाठी अर्ज करण्यापूर्वी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्राशी संपर्क साधावा.
महामंडळात राबविली जाणारी बीज भांडवल कर्ज योजना
या
योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखापर्यंत गुंतवणूकीची प्रकल्प मर्यादा
असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. यामध्ये
राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग 60 टक्के असून अर्जदारास 5
टक्के रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून भरावयाची आहे. राष्ट्रीयकृत
बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या 35 टक्के रक्कम
महामंडळामार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते. सदर 35 टक्के
रक्कमेवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याज आकारण्यात येते. बीजभांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी 5 वर्षाचा असून
बँकेने कर्ज वितरीत केल्यानंतर त्वरीत दुसऱ्या महिन्यापासून महामंडळाच्या बीज
भांडवलाची वसूली सुरु केली जाते. बीज भांडवल वसुली हप्त्याचे आगावू धनादेश घेतले
जातात.
महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या अर्जदार पात्रता अटी व शर्ती
अर्जदार
महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, त्याचे वय 18 ते 45 वर्षे असावे, अर्जदाराचे
नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदविलेले असावे,
अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख
रुपयेच्या आत असावे, अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती
कोणत्याही बँकेची थकबाकीदार नसावी, त्याचे जिल्ह्यात स्थायी
वास्तव्य मागील 3 वर्षे असावे.
बँकेचे
ना-देय प्रमाणपत्र,
तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड
व दोन वेगवेगळे जामीनदार देणे आवश्यक आहे, नुकतेच काढलेले
पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेप्रमाणे इतर कागदपत्रे
करारपत्र/ भाडेपावती जागेबाबत पुरावा तांत्रिक शिक्षणाचे प्रमाणपत्र
महानगरपालिका/ग्रामपंचायत परवाना ड्रायव्हींग लायसन्स परमीट परवाना डिलेव्हरी चलनइत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
Post a Comment