पैलवान सिकंदरला विजया पासून रोखण्याचं काम पैलवान महेंद्र गायकवाडने आज परत एकदा केलं
पैलवान सिकंदरला विजया पासून रोखण्याचं काम पैलवान महेंद्र गायकवाडने आज परत एकदा केलं. विजेता महेंद्रचे हार्दिक अभिनंदन... 💐
कुस्ती ही दोन पायाची वावडी असते. कुस्तीत कधी ही काहीही होऊ शकत. पण सिकंदर गुणावर आधारलेल्या कुस्तीत टेक्निकली कमी आहे, हे त्याच्या चाहत्यांनी समजुन घ्यायला हवं. सिकंदर प्रत्येक वेळी जिंकेलच हा भ्रम त्याच्या चाहत्यांनी दुर ठेवायला हवा. आंतरराष्ट्रीय नियमानुसार गुणावर आधारलेल्या कुस्तीत दबाव प्रचंड असतो. दबाव सहन करणं आणि त्या दबावाचं रुपांतर आत्मविश्वासात करण्याचं तंत्र जे मल्ल आत्मसात करतात ते अशा स्पर्धेत चांगले यशस्वी ठरतात. मॅटवर रोज सराव करुन त्या पद्धतीचे आधुनिक प्रशिक्षण या मल्लांनी घेतलेले असते. महेंद्र त्यापैकीच एक आहे. कमी वयात तो टेक्निकली खुप स्ट्रॉग आहे. त्याच्या यशाचे गमक हेच आहे.
सिकंदर हा पारंपारिक मैदानी कुस्ती लढणारा मल्ल आहे. या मैदानात वेळेचे बंधन नसते. आंतराष्ट्रीय कुस्तीचे नियम इथं नसतात. त्यामुळे खुल्या आत्मविश्वासासह मल्ल फडात कुस्ती लढतो. सिकंदर टेक्निकली त्या पद्धतीचे प्रशिक्षण घेण्यापासून दुर आहे. खुल्या फडात मात्र कुस्ती लढण्यात सिकंदर तरबेज व प्रचंड आत्मविश्वासी असतो.
दम रोखुन कुस्ती करणे, कुस्तीच्या सुरुवातीला आक्रमकता सोडून कुस्ती लढणे, पहिला हाफ हरलो तरी दुसऱ्या हाफ मध्ये पद्धतशीर कुस्ती लढत विजया पर्यंत पोहचणे. हे सर्व गुणावर आधारलेल्या कुस्तीचे टेक्निक्स आहेत. जे महेंद्रने बरोबर वापरले.
महेंद्र थंड थोक्याने, मैदानात पाय रोवून कुस्ती लढतो. सिकंदरची कुस्ती ही आरपारची असते. आजच्या लढतीत पहिल्या हाफ मध्ये सिकंदर आक्रमक होता. त्याचे गुण ही अधिक होते. नंतर कुस्तीत व्यत्यय आला. लढत काही मिनिटे रोखली गेली. सिकंदर या कालावधीतच थंड झाला. तो पुढल्या कुस्तीत चाललाच नाही. महेंद्र या कालावधीत आक्रमक झाला व सहज जिंकला. कुस्ती तशी टोकाची कुठेच झाली नाही. एका गुणाच्या फरकाने महेंद्रने मैदान मारले. सिकंदरने हा सुटसुटीत पराभवर स्विकारला. त्याचे चाहते ही नक्की स्विकारतील. महेंद्र आणि सिकंदर हे एकाद पांढरीतले अर्थात सोलापूर जिल्ह्याचे मल्ल आहेत. कुस्ती संपताच दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली.
महत्वाचा मुद्दा महाराष्ट्र केसरी स्पर्धे दरम्यानच्या सिकंदर व महेंद्रच्या कुस्तीचा वाद हा महेंद्रच्या विरोधात किंवा सिकंदरच्या बाजूने नव्हता तर तो पंचांच्या, ज्युरीच्या निर्णयाच्या संबंधी होता. कुस्तीतल्या प्रस्थापितांवर ते आक्षेप होते. त्याला वेगळे वळण लागले. बाकी कुस्तीत हार जीत चालत राहते. कुस्तीचा, तांबड्या मातीचा तो गुणधर्म आहे. दोन्ही मल्लांमध्ये कुस्ती, तांबडी माती कायम जिंकत असते. कोण जिंकला, कोण हारला हे थोड्या कालावधीसाठी पण आपली कुस्ती कायम चिरंजीव राहायला हवी
Post a Comment