MC Stan
MC Stan
MC Stan
एमसी स्टॅनने बाराव्या वर्षी करिअरला सुरुवात
केली होती. तो वयाच्या बाराव्या वर्षापासून कव्वाली गाायचा. त्याने भारतातील आणि
जगभरातील अनेक मोठ्या गायकांसोबत स्टेजवर परफॉर्म केले आहे. सहावीला असताना त्याने
रॅप लिहायला सुरुवात केली. आठवीला असताना त्याने पहिले रॅप गाणे गायले होते.
त्याने त्याचा व्हिडीओ शूट केला होता पण काही कारणास्तव तो व्हिडिओ रिलीज होऊ शकला
नाही.
Big Boss च्या घरात ८० हजारचे शूज आणि दीड कोटींची चैन घालून
फिरणाऱ्या MC Stan च्या करिअरबद्दल जाणून घ्या
तुम्हाला रॅप गाणी ऐकायला आवडत असतील तर एमसी स्टॅन (MC Stan) हे नाव तुमच्या परिचयाचे असेल. एमसी स्टॅन हा प्रसिद्ध रॅपर आणि हिप-हॉप गायक आहे. भारतासह जगभरात तो आपल्या रॅप गाण्यांद्वारे खूप लोकप्रिय आहे. आता तो बिग बॉस १६ चा विजेता बनलाय. बिग बॉसमध्ये आल्यानंतर त्याच्या राहणीमानावरुन तो चर्चेत आला आहे. असे असले तरी त्याने शिक्षण आणि करिअर (MC Stan Career Details) खूप खडतर परिस्थितीत केले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. एमसी स्टॅनने लहान वयातच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे आणि कलर्स टीव्हीचा रिअॅलिटी शो बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्ये देखील दिसला आहे. आज आम्ही तुम्हाला कोणत्या ब्लॉकमध्ये एमसी स्टेनच्या जीवन परिचयाबद्दल सांगणार आहोत. एमसी स्टॅनचा जन्म ३० ऑगस्ट १९९९ रोजी जन्म पुणे येथील एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. एमसी स्टेनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. पण लोकं त्यांला तुपाक या नावानेही ओळखतात. एमसी स्टॅनने बाराव्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती. तो वयाच्या बाराव्या वर्षापासून कव्वाली गाायचा. त्याने भारतातील आणि जगभरातील अनेक मोठ्या गायकांसोबत स्टेजवर परफॉर्म केले आहे. सहावीला असताना त्याने रॅप लिहायला सुरुवात केली. आठवीला असताना त्याने पहिले रॅप गाणे गायले होते. त्याने त्याचा व्हिडीओ शूट केला होता पण काही कारणास्तव तो व्हिडिओ रिलीज होऊ शकला नाही. ज्यानंतर एमसी स्टॅनने २०१८ मध्ये त्यांचे पहिले गाणे ''वाता गायले जे खूप हिट ठरले, या व्हिडिओला यूट्यूबवर २१ मिलियन्सहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. MC Stan च्या कुटुंबाची परिस्थिती सुरुवातीला इतकी वाईट होती की MC Stan ला सुरुवातीच्या काळात आपला अभ्यास सोडावा लागला होता.
त्याच्या कुटुंबीयांनी रॅप गाण्याला कधीच पाठिंबा
दिला नाही. ते नेहमी त्याला टोमणे मारायचे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत
बिकट आहे, तरीही ते वेळ फुकट
घालवतोय असे शेजारी नातेवाईक त्याला म्हणायचे. पण एमसी स्टेनने कधीही हार मानली
नाही आणि तो कठोर परिश्रम करत राहिला.काही काळानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला
साथ देण्यास सुरुवात केली. आणि आज तो एका मोठ्या स्टेजवर असून त्याच्या पालकांनाही
त्याचा अभिमान वाटतो. MC Stand चा जन्म एका गरीब
कुटुंबात झाला पण त्याच्या मेहनतीमुळे आणि त्याच्या टॅलेंटच्या जोरावर तो आज
श्रीमंत व्यक्ती बनला आहे. बिग बॉसच्या घरात त्याच्या गळ्यात दीड कोटींची चेन आणि
८० हजाराचे शूज घालून फिरत असतो.
Post a Comment