“बहरला हा मधुमास…” गाण्याची डान्सिंग डॅडलाही पडली भुरळ, अमेरिकन सोशल मीडिया स्टारचा व्हिडीओ व्हायरल

 

बहरला हा मधुमास…” गाण्याची डान्सिंग डॅडलाही पडली भुरळ, अमेरिकन सोशल मीडिया स्टारचा व्हिडीओ व्हायरल

बहरला हा मधुमास…” गाण्याची डान्सिंग डॅडलाही पडली भुरळ, अमेरिकन सोशल मीडिया स्टारचा व्हिडीओ व्हायरल

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीरया चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. महाराष्ट्र शाहीरचित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे. बहरला हा मधुमासगाण्याची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. या गाण्यावरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अमेरिकन सोशल मीडिया स्टार असलेल्या रिकी पाँडलाही या गाण्याची भुरळ पडली आहे. डान्सिंग डॅड फ्रॉम युएसएम्हणून प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँड यांनी बहरला हा मधुमासगाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये गाण्याची हुक स्टेप करताना ते दिसत आहेत. रिकी पाँड यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.



रिकी पाँड यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बहरला हा मधुमासगाण्यावरील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी हे नवं गाणं कसं वाटलं? मला वाटतं मी चांगलं केलं आहे,” असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. रिकी पाँड हे अमेरिकेतील प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आहेत. बॉलिवूड गाण्यावरही ते व्हिडीओ बनवतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात. दरम्यानबहुचर्चित महाराष्ट्र शाहीरचित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील बहरला हा मधुमासहे गाणं प्रसिद्ध बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल यांनी गायलं आहे. तर कृती महेशने गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.