Dream 11 Team : अवघ्या ४९ रुपयांत टीम बनवली,जिंकले दीड कोटी! ट्रक ड्रायव्हरचं 'ड्रीम' झालं पूर्ण
Dream
11 Team : अवघ्या ४९ रुपयांत टीम बनवली,जिंकले
दीड कोटी! ट्रक ड्रायव्हरचं 'ड्रीम' झालं
पूर्ण
Dream
11 Team : अवघ्या ४९ रुपयांत टीम बनवली,जिंकले
दीड कोटी! ट्रक ड्रायव्हरचं 'ड्रीम' झालं
पूर्ण
देव देतो
तेव्हा छप्पर फाड देतो. याची प्रचिती वेगवेगळ्या घटनांमधून येते. अशीच एक घटना
सध्या चर्चेत आहे. मध्यप्रदेशात बडवानी जिल्ह्यात राहणारा शहाबुद्दीन नावाचा
ड्रायव्हर रातोरात कोट्यधीश बनला. त्यांनी फँटसी अॅपमध्ये टीम बनवून तब्बल दीड
कोटी रूपये कमावले आहेत.
झालं असं की, व्यावसायाने ड्रायव्हर असलेल्या शहाबुद्दीन यांनी आयपीएल स्पर्धेत कोलकाता आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान टीम बनवली होती. ज्यामध्ये ते पहिल्या क्रमांकावर राहिले. ज्यामुळे त्यांना दीड कोटीचं बक्षीस मिळालं आहे. मजेशीर बाब म्हणजे त्यांनी ही टीम बनवण्यासाठी अवघे ४९ रुपये खर्च केले होते. भास्करने दिलेल्या वृत्तानुसार शहाबुद्दीन तब्बल दोन वर्षांपासून ऑनलाईन गेमिंग अॅपवर स्वतःचे नशीब आजमावत आहेत.
यादरम्यान
त्यांनी शनिवारी १ एप्रिल रोजी कोलकाता आणि पंजाब यांच्यात झालेल्या
सामन्यादरम्यान त्यांनी नशीब आजमावलं. त्यांनी ४९ रुपये खर्चून एंट्री फी
कॅटेगरीमध्ये टीम बनवली. यानंतर नशीबाने साथ दिली आणि शहाबुद्दीन पहिल्या स्थानावर
राहिले आणि त्यांनी दीड लाख रुपये जिंकले.
यानंतर तब्बल १.०५ कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार
आहेत. उर्वरीत बक्षीसाची रक्कम ३० टक्के पैसे हे टॅक्स म्हणून द्यावे लागतील. या
गेममध्ये कुठलीही युक्ती चालत नाही हा केवळ नशीबाचा भाग आहे. दोन वर्षात
शहाबुद्दीन यांचं नशीब चमकलं.
पैसे
जिंकले, आता काय करणार?
शहाबुद्दीन यांनी हे पैसे जिंकल्यानंतर प्रचंड आनंद व्यक्त केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, या पैशातून ते आधी स्वतःचे
घर बांधतील. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, मी
ड्रायव्हर असून सध्या भाड्याच्या घरात राहतो. या बक्षिसाच्या रकमेतून मी स्वतःचे
घर बांधण्याचे पहिले स्वप्न आहे. यानंतर मी दुसरा व्यवसाय करेन. एवढी मोठी बक्षीस
रक्कम जिंकल्यानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण असून आजूबाजूचे लोक घरी येऊन आमचे
अभिनंदन करत आहेत.
टीम
मध्ये कोण-कोण होतं?
शहाबुद्दीन यांच्या ड्रीम ११ टीममध्ये अर्शदीप याला कर्णधार
बनवण्यात आलं होतं, उपकर्णधार सिकंदर रजा होता. तसेच टीममध्ये शिखर
धवन, भानुका राजपक्षा, आर गुरबाज,
नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सॅम करन, टिम
साउदी आणि राहुल चहर यांचा समावेश होता.
मॅचमध्ये
काय झालं?
या मॅचमध्ये पंजाब किंग्सने डकवर्थ लुइस मेथडने सात रणांनी विजय
मिळवला. पंजाबने पहिल्यांदा बॅटिंग करत पाच विकेट्सच्या बदल्यात १९१ धावा केल्या.
भानुका ने ५० आणि धवनने ४० धावा केल्या. या बदल्यात कोलकात्याचा संघ १६
ओव्हर्समध्ये ७ विकेट्सच्या बदल्यात १४६ धावा करू शकली.
Post a Comment