करोनाने पुन्हा पाय पसरवायला सुरुवात केली आहे. त्यातच आता करोनाच्या नव्या तापामुळे टेन्शन वाढवले आहे. जाणून घ्या काय आहे एक्सबीबी १.१६...

 

करोनाने पुन्हा पाय पसरवायला सुरुवात केली आहे. त्यातच आता करोनाच्या नव्या तापामुळे टेन्शन वाढवले आहे. जाणून घ्या काय आहे एक्सबीबी १.१६...


करोनाने पुन्हा पाय पसरवायला सुरुवात केली आहे. त्यातच आता करोनाच्या नव्या तापामुळे टेन्शन वाढवले आहे. जाणून घ्या काय आहे एक्सबीबी १.१६...

            दोन वर्षांपूर्वी या काळात देशातच नव्हे, तर जगभरात कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू होते. वेगाने होणारा संसर्ग आणि बळी पडणाऱ्यांची वाढती संख्या यामुळे भीतीचे वातावरण होते. एखाद्या दु:स्वप्नासारखा वाटणारा हा काळ केव्हाच मागे सरला आहे. दरम्यानच्या काळात कोव्हिडवर लसी विकसित झाल्या आणि भारतासारख्या १३५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातही आजतागायत २२० कोटींहून अधिक लसमात्रा दिली गेली आहे. याचा अर्थ बहुतेक सर्वांना किमान लसीची किमान एक मात्रा दिली गेली आहे. दुसरी मात्राही घेतलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. लसीकरणाची मोहीम अखेरच्या टप्प्यात असतानाच कोव्हिडच्या रुग्णांची संख्या घटत गेली. गेल्या वर्षभरात सारे काही पूर्वपदावर आले. सार्वजनिक व्यवहार, सभा-समारंभ, सण आणि उत्सव हे सारे धुमधडाक्यात होऊ लागले.

रस्त्यांवरील गर्दी कोव्हिडपूर्व काळाप्रमाणे आहे. कोव्हिडची साथ जणू संपली अशाच मानसिकतेत बहुतेक लोक आहेत. कोव्हिडची साथ संपली नसली, तरी साथरोगाचे स्वरूप स्थानिक स्वरूपाच्या आजारासारखे (एंडेमिक) असून, कोव्हिड आता साधा फ्लू किंवा तत्सम आजारासारखा बनल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काळजी घेण्याची गरजही ते व्यक्त करीत आहेत; कारण ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजार असलेले; तसेच अन्य व्याधी जडलेले रुग्ण, गर्भवती महिला आदींना कोव्हिडचा धोका कायम आहे. पुण्यासह राज्यात आणि एकूणच देशात कोव्हिडची रुग्णसंख्या वाढत असल्याने, तज्ज्ञांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोव्हिड साथरोग असतानाच्या काळात मास्क लावण्यापासून सतत हात धुण्यापर्यंत दक्षतेचे जे उपाय आखले होते, ते पुन्हा आचरणात आणण्याची गरज आहे.

देशात सध्या कोव्हिडचे ५७,५४२ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णसंख्या संथगतीने वाढत असून, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ या राज्यांत कोव्हिडमुळे मृत्यूही झाले आहेत. कोव्हिडचा विषाणू सतत स्वत:त बदल करीत असतो. यामुळे ठरावीक अंतराने साथ पुन्हा नव्याने येत असते. सध्या एक्सबीबी १.१६या उपप्रकाराचा विषाणू सक्रिय आहे; त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांत हवामानातही बदल होतो आहे. रात्री आणि पहाटे थंडी, दुपारपर्यंत रणरणते ऊन आणि संध्याकाळी पाऊस असे वातावरण अनेक ठिकाणी आहे. अशा प्रकारच्या हवामानात सर्दी, खोकला होण्याची शक्यता अधिक असते. जोडीला ताप, अंगदुखी ही लक्षणेही दिसू लागतात. ही तशी फ्लूची लक्षणे; परंतु कोव्हिडचीही लक्षणे अशाच प्रकारची असल्याने काळजी घेण्याची गरज असते. सर्दी-खोकला वाढला, तर त्वरेने डॉक्टरांकडे जाणे, गर्दीत जाणे टाळणे, मास्क वापरणे आणि योग्य औषधोपचार घेऊन विश्रांती घेणे महत्त्वाचे असते. मात्र, अनेकांना आजार अंगावर काढण्याची सवय असते. सर्दी-खोकल्याने काय होते, असे म्हणत ते आपला नित्यक्रम सुरू ठेवतात. यामुळे काहींच्या आजाराची तीव्रता वाढू शकते; शिवाय संसर्ग वाढण्याचाही धोका असतो. तो आता प्रत्यक्षात येत असल्याकडे तज्ज्ञ अंगुलिनिर्देश करीत आहेत. आजाराकडील दुर्लक्षाची पुढे कशा प्रकारे किंमत मोजावी लागते, याचा अनुभव अनेकांनी कोव्हिड साथरोगाच्या काळात घेतला आहे; त्यामुळे प्रत्येकाने गांभीर्य ओळखून वर्तन करण्याची गरज आहे.

 

एक्सबीबी १.१६उपप्रकाराच्या विषाणूची साथ आणखी महिनाभर कायम राहील आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून साथ कमी होत जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. म्हणजेच, आणखी महिना-दीड महिना दक्षता बाळगणे आवश्यक आहे. कोव्हिडच्या काळात नित्यनेमाने मास्क वापरणारे सध्या मास्ककडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. गर्दीमध्ये एखाद-दुसरी व्यक्तीच मास्क वापरताना दिसते. हा निष्काळजीपणा सोडायला हवा. सर्वांनी आणि विशेषत: संसर्गाचा धोका अधिक असणाऱ्या गटातील लोकांनी मास्क वापरायलाच हवे. ज्येष्ठ नागरिकांनी किंवा अन्य व्याधी असलेल्यांनी मास्क वापरावा यासाठी कुटुंबीयांनी दक्ष राहायला हवे. रुग्ण वाढू लागल्यानंतर लसीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दोन्ही मात्रा घेतलेल्यांसाठी वर्धक मात्रा उपलब्ध असूनही बहुतेकांनी त्याकडे पाठ फिरवली. लसींचे साठे अनेक दिवस पडून होते. आता त्यांची मुदत संपली आहे. नव्याने लस उपलब्ध करून देण्यापासून उपचाराबाबत सज्ज राहण्याची गरज आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत ६२७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी ३५१ रुग्ण पुण्यातील आहेत. कोव्हिडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पुण्याला मोठा फटका बसला आहे. त्यापासून धडा घेत पुणेकरांनी सावधानता बाळगावी आणि प्रशासनने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी.

हा धोका  कसा पसरतो?

त्वचेचा संपर्क, जखमा, लाळ आणि लैंगिक संबंधाद्वारे सुपरबगचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत फैलाव होतो. सुपरबग मानवी शरीरात गेल्यावर औषधांचा रुग्णावर परिणाम होणे थांबते. सुपरबगवर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही.

लॅन्सेटने कोरोना महामारीच्या काळात काही दिवसांपूर्वी सुपरबगमुळे झालेल्या मृत्यूंचा अभ्यास केला आहे. अहवालानुसार, 2021 मध्ये, ICMR ने 10 रुग्णालयांमध्ये एक अभ्यास केला आणि असे आढळून आले की, कोरोनानंतर लोकांनी अँटीबायोटिक्सचा वापर वाढवला आहे. कोरोनाची लागण झालेल्या कोविड रुग्णांपैकी 50 टक्क्यांहून अधिक रुग्णांना उपचारादरम्यान किंवा नंतर विषाणू,  बुरशीमुळे संसर्ग झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. या अभ्यासानुसार, जगात प्रतिजैविकांचा वापर याच दराने वाढत राहिला तर ती धोक्याची घंटा ठरू शकते. 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.